US Election Result : 5 महिलांसह 12 भारतीयांनी जिंकली स्टेट इलेक्शन

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   अमेरिकेत राष्ट्रपती निवडणुकीच्या निकालासाठी अद्याप मतमोजणी चालू आहे आणि डेमोक्रॅटचे उमेदवार जो बिडेन बहुमताच्या जवळ आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीशिवाय अमेरिकेत राज्य निवडणुकाही झाल्या असून त्यामध्ये सध्या भारतीय वंशाचे 12 उमेदवार विजयी झाले आहेत. विजयी उमेदवारांमध्ये 5 महिलांचा समावेश आहे. दुसरीकडे, भारतीय वंशाचे चार उमेदवार प्रतिनिधी सभागृहात पुन्हा निवडून आले आहेत. ते समोसा कॉकस म्हणून लोकप्रिय आहेत.

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कॉंग्रेससाठी डॉक्टर अ‍ॅमी बेरा, प्रमिला जयपाल, रो खन्ना आणि राजा कृष्णमूर्ती. दरम्यान, आणखी तीन उमेदवार विजयी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या डॉक्टर हिरल टिपरेनाई अ‍ॅरिजोनामध्ये पुढेप आहेत. मात्र, सिनेटच्या जागेच्या बाबतीत त्यांची धार फारच कमी आहे. दुसरीकडे, रूपेंद्र मेहता न्यू जर्सी राज्य युनिट आणि नीना अहम पेनसिल्व्हानिया ऑडिटर जनरलच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.

राज्य निवडणुकीतही भारतीयांचा विजय

मिळालेल्या माहितीनुसार नीरज अंताणी यांनी ओहायो स्टेट सिनेटमधून विजय मिळविला आहे. ओहायोमधून सिनेटवर निवडून गेलेले नीरज अंताणी हे पहिले भारतीय अमेरिकन आहेत. 29 वर्षीय नीरज हे रिपब्लिकन आहेत आणि ते अवघ्या 23 वर्षांच्या वयाच्या प्रतिनिधी सभागृहात निवडून आल्याची नोंद आहे. ही निवडणूक जिंकणारे ते सर्वात तरुण भारतीय अमेरिकन बनले आहेत . निरजशिवाय उत्तर कॅरोलिना राज्य सिनेटमधून दुसऱ्यांदा जय चौधरी , अ‍ॅरिझोना स्टेट सिनेटमधून अमिश शाह, पेनिसिल्वेनियातून निखिल सावळ, मिशिगन स्टेट युनिटमधून राजीव पुरी, न्यूयॉर्क स्टेट सिनेटमधून जर्मी कोने, कॅलिफोर्नियाच्या सिनेटमधून अॅश कालरा आणि टेक्सास जिल्ह्यातील रवी सेंदिल विजयी झाले आहेत.

या महिला विजयी

पद्म कुपा (मिशिगन स्टेट हाऊस) – पद्म कुपा डेमिक्रॅटिक पार्टीमधून मिशिगन स्टेट हाऊसवर निवडून आल्या आहेत. पद्मा या पदासाठी निवडले गेलेल्या पहिल्या हिंदू डायस्पोरा आहेत. त्यांना मिशिगनमध्ये असिस्टंट व्हिपसाठीदेखील त्यांना नॉमिनेट करण्यात आले आहे.

जेनिफर राजकुमार (न्यूयॉर्क स्टेट असेंब्ली) – भारतीय-अमेरिकन जेनिफर राजकुमार न्यू यॉर्क राज्य विधानसभेवर निवडल्या गेलेल्या दक्षिण आशियाई पहिल्या महिला आहेत. जेनिफर राजकुमार बर्‍याच काळापासून समाजसेवा करीत आहेत. राजकुमार हे व्यवसायाने वकील आहेत.

केशा राम (वर्माँट स्टेट सिनेट) – केशा राम यांचा जन्म 1986 मध्ये झाला होता. एक तरुण भारतीय-अमेरिकन राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे, केशा रामचे वडील ज्यू आणि आई हिंदू आहेत. केशा कायदेशीर सल्लागार म्हणून काम करतात.

निमा कुलकर्णी (केंटूकी स्टेट हाऊस) – निमा कुलकर्णी यांनी मिशिगन विधानसभेची निवडणूक जिंकली. निमाने बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचा अभ्यास केला आहे. कुलकर्णी, डेमोक्रॅट सदस्य, इमिग्रेशन अटॉर्नी म्हणून काम करतात.

वंदना स्लेटर (वॉशिंग्टन स्टेट हाऊस) – वंदना स्लेटर कॅनेडियन-अमेरिकन आहे. वंदना आणि तिचे कुटुंब शीख समाजात खूप लोकप्रिय आहे. वंदनाचे वडील डॉक्टर असून त्यांनी स्वत: फार्मसीचे शिक्षण घेतले आहे. या व्यतिरिक्त, त्यांचे उच्च शिक्षण पब्लिक पॉलिसीचे स्पेशलायझेशनसह आहे.