‘व्हॅलेंटाईन डे’ पडला महागात ! विनयभंगासह ‘अ‍ॅट्रोसिटी’चा गुन्हा दाखल

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन  – खामगाव येथील एका विद्यालयात विद्यार्थीनीला ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी प्रपोज करणे एका युवकाला चांगलेच महागात पडले. शाळेच्या आवारात जाऊन विद्यार्थीनीची छेड काढल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्याविरोधा विनयभंगाबरोबरच अ‍ॅट्रोसिटी कायद्यान्वयेही गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील एका नामांकित शाळेत विद्यार्थींनी समुपदेशनाच्या कार्यक्रम आयोजत करण्यात आला होता. मुलींच्या या शाळेत मुलांना जाण्यास बंदी आहे. असे असताना हा युवक आपल्या मित्रांना घेऊन सिनेस्टाईल दादागिरी करीत शाळेच्या आवारात शिरला. त्याने कार्यक्रम सुरु असताना त्याने एका विद्यार्थीनीला इशारा केला.

विद्यालयात एका बाजूला घेत त्याने आपल्या हातातील गुलाब त्या मुलीला देण्याचा प्रयत्न केला. हे विद्यालयाच्या आवारातील विद्यार्थींनीना दिसले. त्यांनी आरडाओरडा केला. तेव्हा शिक्षक व इतर कर्मचारी तेथे आले. त्यांनी त्या युवकाला पकडून ठेवले. या घटनेची माहिती मुलीच्या घराच्यांना पडली. हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरुन युवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाच त्याच्या बरोबर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

You might also like