Vijay Shivtare On Ajit Pawar | अजित पवार भाजपमध्ये येणार हे कोणाला आवडणार नाही, त्यांनी शिवसेनेत यावं; विजय शिवतारेंचे खुलं आमंत्रण

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Vijay Shivtare On Ajit Pawar | राष्ट्रवादीचे नेते (NCP) अजित पवार (Ajit Pawar) हे सरकारसोबत जाणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. याच दरम्यान रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. तर आता शिंदे गटाचे (Shinde Group) प्रवक्ते आणि माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी अजित पवार हे राष्ट्रवादीत अस्वस्थ आहेत. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत (Shivsena) यावं असं आमंत्रण दिले आहे. अजित पवार यांनी अस्वस्थेतूनच पहाटेची शपथ घेतलली होती. हे देशाला आणि राज्याला माहिती असल्याचे विजय शिवतारे म्हणाले. ते इंदापूरमधील (Indapur) पत्रकार परिषदेत बोलत होते. (Vijay Shivtare On Ajit Pawar)

 

अजित पवार चुकीच्या पक्षात
विजय शिवतारे पुढे म्हणाले, अजित पवार हे थोतांड माणूस नाही. कोणीतरी सांगितलं म्हणून गेले आणि पुन्हा परत आले यावर माझा विश्वास नाही. कारण तिकडे जे चालू होते ते ठीक नव्हते म्हणून ते तिकडे गेले. भाजप (BJP) हा राष्ट्रीय पक्ष आहे तर शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आहे. अजित पवार भाजपमध्ये येणार हे कोणाला आवडणार नाही, असे म्हणत अजित पवार यांनी शिवसेनेत यावं असं आमंत्रण विजय शिवतारे यांनी दिले.

बाकी सगळी लुटारुंची टोली
राष्ट्रवादीमध्ये फक्त अजित पवार काम करणारा माणूस आहे. बाकी सगळे लुटारुंची टोळी आहे.
ते चुकीच्या पक्षात आहेत. त्यांनी पक्ष सोडण्याची मी वाट पाहात असल्याचे शिवतारे यांनी सांगितले.
विजय शिवतारे दौड (Daund), बारामती (Baramati) आणि इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत.
त्यांनी बारामती तालुक्यातील खांडज आणि दुषीत नीरा नदीची पाहणी केली.
यावेळी त्यांनी कारखान्याने दुषीत पाणी नदीत सोडणे बंद करण्याची मागणी करत
राष्ट्रीय हरित लवादाकडे (National Green Tribunal (NGT) मला जायला लावू नये असा इशारा त्यांनी दिला. (Maharashtra Politics News)

 

Web Title :- Vijay Shivtare On Ajit Pawar | shivsena vijay shivtare comment on ncp leader ajit pawar in indapur maharashtra politics news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

CM Eknath Shinde | राज्यातील बसस्थानकांचे विमानतळांप्रमाणे अद्ययावतीकरण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Chandrakant Patil | मुलींच्या शिक्षण, सक्षमीकरणावर शासनाचा भर – मंत्री चंद्रकांत पाटील

Unseasonal Rains In Pune | अलर्ट ! आगामी 2 दिवस पावसाचे, पुणेकरांनी घ्यावी काळजी

PM Formalisation of Micro Food Processing Enterprises Scheme (PMFME) | पुणे : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत महाराष्ट्र अग्रेसर ! देशात सर्वाधिक 6 हजार 592 वैयक्तिक प्रकल्पांना मंजुरी