Vijay Wadettiwar | ‘उद्धव ठाकरेंनी हनुमान चालिसा वाचायला ते काय तुमच्या बापाचे…’: मंत्री विजय वडेट्टीवारांची जीभ घसरली

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Vijay Wadettiwar | राणा दाम्पत्य (Navneet Rana & Ravi Rana) आणि शिवसेनेमध्ये (Shvsena) मोठा वाद निर्माण झाला होता. याच प्रकरणात राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) झाली आहे. मात्र यावरून आता वातावरण तापलेलं दिसत आहे. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव ( MLA Bhaskar Jadhav) यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला होता. अशातच राणा दाम्पत्यावर बोलताना काँग्रेस नेते आणि मदत-पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांची जीभ घसरली आहे.

 

राणा दाम्पत्याने विनाकारण आतंक माजवला असून त्यांनी मुंबई (Mumbai) आणि दिल्लीला (Delhi) वेठीस धरलं आहे. हे सर्व करण्यामागे त्यांचा उद्देश काय आहे हे समजत नाही. मुंबईला अशांत करून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं काम त्यांनी केलं आहे. तुम्हाला जिथं म्हणायचं आहे तिथं हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) म्हणा, उद्धव ठाकरे यांनी वाचायला ते काय तुमच्या बापाचे…आहेत काय?, असे काही नालायक देशात झाले असल्याचं विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी म्हटलं आहे.

 

घरोघरी हनुमान चालिसा वाचली जाते, हिंदू धर्मात लग्नाआधी हनुमानाचं दर्शन घ्यावं लागतं आणि हे आम्हाला सांगत आहेत की हनुमान चालिसा वाचावी, ज्याने त्याने आपल्या धर्माचं पालन केलं पाहिजे असं वडेट्टीवार म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवरही (MNS Chief Raj Thackeray) टीका केली. चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील बल्लारपूर येथे काँग्रेसच्या आरोग्य शिबिरामध्ये ते बोलत होते.

 

दरम्यान, राज ठाकरे यांचा चोंगा (पायजमा) फाटला असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. वडेट्टीवारांच्या टीकेमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Vijay Wadettiwar | Mahavikas Aghadi Maharashtra Thackeray Government Minister
Vijay Wadettiwar On MNS Chief Raj Thackeray And MP Navneet Rana – MLA Ravi Rana

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा