वडगावशेरी पुन्हा राष्ट्रवादीकडे, सुनील टिंगरे विजयी !

वडगावशेरी : पोलीसनामा ऑनलाइन – कधीही आमदार रिपीट न करण्याचा विक्रम वडगावशेरी मतदार संघाने कायम ठेवला आहे. राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे यांनी भाजपच्या जगदीश मुळीक यांचा 4,975 अशा मताधिक्याने पराभव केला आहे.

भाजपच्या जगदीश मुळीक यांना 92,725 मते मिळाली तर सुनील टिंगरे यांना 97,700 मते मिळाली आहेत. तर 2,417 मते नोटाला मिळाली आहेत.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेने स्वबळावर निवडणुका लढविल्या होत्या. त्यावेळी टिंगरे हे शिवसेनेकडून लढले होते.

वडगावशेरी मतदारसंघ

1.सुनील टिंगरे (राष्ट्रवादी ) – 97,700 मते  विजयी  झालेले उमेदवार 
2. जगदीश मुळीक (भाजप ) – 92,725 मते
3. बेंगळे राजेश दत्तात्रेय (बहुजन समाज पार्टी) – 1653 मते
4. गणेश बाळकृष्ण ढमाले (आम आदमी पार्टी) – 908 मते
5. डॅनियल लांडगे (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन) – 7702 मते
6. प्रविण बापूराव गायकवाड (वंचित बहुजन अघाडी) – 10276 मते
7. प्रसाद सुभाष कोद्रे (प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी) – 174 मते

Visit : Policenama.com