थायलंडमध्ये माकडांनी माजवला प्रचंड उत्पात, 200 माकडांचे प्रायवेट पार्ट कापण्याचे आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  थायलंडमधील माकडांनी अशी भीती निर्माण केली आहे की तेथील सरकारला एक विचित्र निर्णय घ्यावा लागला. सरकारच्या आदेशानंतर वन्य प्राण्यांवर कारवाई करणार्‍या विभागाने 200 हून अधिक माकडांचा प्रायवेट पार्ट कापले आहेत.

हा निर्णय घेण्यात आला जेणेकरून तेथील माकडांचा प्रजनन दर कमी करून त्यांची दहशत रोखता येईल. लॉकडाऊन दरम्यान माकडांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे आणि ते सोंगखला शहरात प्रवेश करून लोकांना त्रास देत आहेत.

डेली मेलच्या वृत्तानुसार, वन्यजीव विभागाने लोकांना त्रास देणार्‍या अशा 200 माकडांना बंदिस्त केले आणि नंतर त्यांचा प्रायवेट पार्ट कापला. असे केल्यामुळे वानर त्यांची संख्या वाढवू शकणार नाहीत. याबरोबरच या माकडांना एक विशेष चिन्हही लागू केले गेले आहे जेणेकरून भविष्यात अशी काही समस्या परत आली तर त्यांची ओळख पटेल.

एका अधिकाऱ्याने सांगितले की आम्हाला माकडांची संख्या नियंत्रित करण्याची गरज होती कारण ते लोकांच्या घरात घुसून त्यांचे खाणे व आवश्यक वस्तूंची नासधूस करून अशांतता निर्माण करीत होते.

अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, लोक म्हणाले होते की माकडांची वाढती संख्या त्वरित नियंत्रित करणे आवश्यक आहे, अन्यथा ते अडचणींना कारणीभूत ठरतील आणि मानवांसोबत त्यांचा संघर्ष आणखी वाढू शकेल.