कमालच ! महिलेनं साडी नेसून केला ‘भन्नाट’ स्टंट, बघणार्‍यांचे डोळेच विस्फटले (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  अलीकडे इंटरनेटवर एखादा अजब व्हिडिओ व्हायरल होतो. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्याची सर्वत्र चर्चा आहे. या व्हिडिओमध्ये एका महिलेने चक्क साडी नेसून बॅक फ्लिप मारली आहे. त्यामुळे अनेकजण हा व्हिडिओ पाहून आश्चर्यचकित झाले आहेत.

१३ जून रोजी हा व्हिडिओ वारियर संगीता या ट्विटर जरने आपल्या ट्विटरवर शेअर केला होता. त्यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ‘काय टॅलेंट आहे. नो शूज, नो प्रॉपर फ्लोअर आणि ते पण साडीत. बघा, किती व्यवस्थितपणे ती तिच्या हातांवर लँड झालीये.’

आपण अनेक स्टंट करणारे लोक पाहिले असतील, पण या महिलेने चक्क साडी नेसून बॅक फ्लिप मारली आहे. त्यामुळेच लोक सोशल मीडियावर या महिलेचे खूप कौतुक करत आहेत.

या व्हिडिओबद्दल बातमी होईपर्यंत तो ३ लाख ६४ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तसेच १८.९ हजार लोकांना आवडला असून ३.६ हजार रिट्विट देखील आले आहेत.