धुळे जिल्ह्यात राजकीय वैमनस्यातून तरुणाचा खून ? ; भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – पाच ते सहा जणांनी राजकीय वैमनस्यातून तरुणाला जबर मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना धुळे जिल्ह्यातील रामी येथे घडला आहे. दरम्यान त्याला भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.

मनोज उत्तम महाजन असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी व संतप्त ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

मनोजला गुरुवारी सायंकाळी ५ ते ६ च्या सुमारास जबर मारहाण केली. त्यानंतर त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मतदानाच्या दिवशी मनोजचा भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत काही वाद झाला होता असं कुटुंबियांचं म्हणणं आहे. दरम्यान हे ५ ते ६ जण युवक भाजपचे कार्यकर्ते असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. मात्र पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला नसल्याने ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. तर आरोपींना तात्काळ अटक कऱण्याची मागणी केली आहे.