विकृतीचा व्हायरस ? सामूहिक बलात्काराची इच्छा, हार्डकोर पॉर्न पाहणं आणखी बरचं काही, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची ‘अवस्था’

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन – मोबाईल स्मार्ट फोनमुळे तर पॉर्न व्हिडीओ कुठेही बघणं शक्य होतं. त्यामुळे अनेक तरुणांना पॉर्न व्हिडीओ पाहण्याचं व्यसन जडलं आहे. रेस्क्यू रिसर्च अँड ट्रेनिंग चॅरिटेबल ट्रस्टने मुंबई शहरातल्या 30 इंग्रजी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केलेल्या सर्वेक्षणातून  अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.  सर्वेक्षणातील 40 टक्के तरुणांनी पॉर्न व्हिडीओतही खास करुन बलात्काराचे व्हिडीओ पाहणं आवडत असल्याचं सांगितलं आहे तर 63 टक्के युवकांनी तर थेट सामूहिक बलात्कारात भाग घेण्याचीही इच्छा व्यक्त केली आहे.

सर्वेक्षणातील धक्कादायक गोष्टी –

सर्वेक्षणानुसार, कामुक संदेशन-सेक्स्टिंग, अनैसर्गिक-हिंसक शरीरसंबंधांबद्दल आकर्षण, किशोर किंवा बाल वयातील मुला-मुलींचे पॉर्न पाहणं, वेश्यागमनाची इच्छा अशा प्रवृत्ती तरुणांमध्ये वाढीस लागत आहे.  शरीरसुखाच्या अनुभवासाठी मुलांना  हार्डकोर पॉर्न बघणं आवडतं अशी कबुली त्यांनी दिली आहे.  त्यातही त्यांना बलात्काराबद्दल खास आकर्षण वाटत होतं.

काहींना तर सामूहिक बलात्कारात सहभागी होण्याचीही इच्छा व्यक्त केली.  सर्वेक्षणातील 26 टक्के मुलांनी वास्तवात वेश्यागमनाचा मार्ग पत्करला तसेच 46 टक्के तरुणांना चाईल्ड पॉर्न बघण्यात रस असल्याचं आढळून आलं आहे. मुंबईतील महाविद्यालयीन तरुण दरदिवशी सुमारे 20 लाख रेप व्हिडीओ पाहतात. अशी हादरून टाकणारी माहिती समोर आली आहे.

रेस्क्यू रिसर्च अँड ट्रेनिंग चेरिटेबल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक क्लिफोर्ड  यांनी  हे सर्वेक्षण केलं असून ते इंग्लडमधील रहिवासी  आहेत.  या विषयावरील संशोधनासाठी ते भारतात आले. या सर्वेक्षणासाठी त्यांनी शहरातील 30 इंग्रजी कनिष्ठ महाविद्यालयं निवडली. त्यावरून हा धक्कदायक निष्कर्ष समोर आला आहे.