‘माझे फोटो पोस्ट करू नका, तसं केलं असेल तर डिलीट करा’ : जायरा वसीम

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   जूनमध्ये धर्माचं कारण देत बॉलिवूडमधून सन्यास घेणारी अभिनेत्री जायरा वसीम पुन्हा चर्चेचा हिस्सा बनली आहे. सध्या तिनं शेअर केलेली एक पोस्ट सोशलवर चर्चेत आली आहे. एक पोस्ट शेअर करत जायरानं तिच्या फॅन पेजेस आणि चाहत्यांना विनंती केली आहे की, तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करू नका. जर असं केलं असेल तर ते डिलीट करा. यामागील कारणंही तिनं तिच्या पोस्टमधून सांगितलं आहे.

जायरा आपल्या पोस्टमध्ये म्हणते की, माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात तुम्ही दिलेली साथ मी कधीही विसरणार नाही. मी माझ्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. मी अ‍ॅक्टिंग फिल्ड सोडलं आहे. त्यामुळं सोशल मीडियावरील माझे फोटो डिलीट करा. मी स्वत: इंटरनेटवरून ते सर्व फोटो काढू शकत नाही. त्यामुळं माझ्या फॅन पेजेसला विनंती करते की, त्यांनी माझे फोटो डिलीट करावेत, असंही ती आपल्या या पोस्टमध्ये म्हणाली आहे.

दंगल सिनेमातून लोकप्रियता मिळवणाऱ्या जायरा वसीमनं 29 जून रोजी बॉलिवूडमधून सन्यास घेण्याचा निर्णय घेतला होता. इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिनं आपला निर्णय जाहीर केला होता. 18 वर्षीय जायरानं धर्माचं कारण सांगत बॉलिवूडमधून सन्यास घेण्याचा निर्णय घेतला होता. 2019 मध्ये रिलीज झालेला सिनेमा द स्काय इज पिंकमध्ये जायरा शेवटची दिसली होती. या सिनेमात प्रियंका चोपडा आणि फरहान अख्तर लिड रोलमध्ये होते. दंगल या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. सिक्रेट सुपरस्टार या सिनेमातही तिनं काम केलं आहे.

You might also like