नागपूर : नितीन गडकरींना धक्का, बावनकुळेंच्या गावात जनतेनं दिली काँग्रेसला ‘साथ’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन –  विधानसभेच्या निवडणुकीनंतर झालेल्या सत्तानाट्यानंतर सध्या राज्यात जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. मंगळवारी झालेल्या मतदानानंतर आज नागपूरसह धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि पालघर या सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. बुधवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सर्वच जिल्हा परिषदांमध्ये आजी-माजी मंत्र्यांसह सर्वच पक्षातील दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान, मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यातच केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांना मोठा धक्का बसला आहे. धापेवाडा या गडकरींच्या मूळ गावी काँग्रेसचे उमेदवार काँग्रेसचे महेंद्र डोंगरे विजयी झाले आहेत.

यंदा, नागपूर जिल्हा परिषद निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी महत्वाची मानली जात असून भाजपाला आपले अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी ही लढाई मानली जात आहे. नागपूर येथील जिल्हा परिषदेच्या 58 गटांसाठी 270 उमेदवार मैदानात उतरले आहेत. तर 13 पंचायत समित्यांच्या 116 गटांसाठी मतदान झाले.

2014 मध्ये नागपूरमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला 12 पैकी 11 जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेसला फक्त एका जागेवर समाधान मानव लागलं होत. मात्र 2019 मध्ये संपूर्ण चित्र पालटताना दिसत आहे. यंदा काँग्रेस-राष्ट्रवादीने मिळून पाच जागा मिळवल्या

1 मेटपांजरा सर्कल मधून विजयी जिल्हा परिषद सदस्य म्हणून सलिल देशमुख पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

2 राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलिल देशमुख विजयी.

3 पारडसिंगा जिल्हा परिषद – चंद्रशेखर कोल्हे, राष्ट्रवादी विजयी,

4 लाडगाव – राष्ट्रवादी निलिमा ठाकरे विजयी

5 पारडसिंगा शेकाप उमेदवार धम्मापाल खोब्रागडे विजयी

6 चंद्रशेखर बावनकुळे यांना डावलल्याने मतदारांची भाजपवर नाराजी कायम , बावनकुळे यांच्या कोराडी या मुळ गावातंही भाजप विरोधी मतदान, कोराडीतून काँग्रेसचे नाना कंभाले विजयी

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/