5000 ची लाच घेताना पोलिस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – दाखल गुन्ह्यात तपासात मदत करण्यासाठी व जामीन लवकर होण्यासाठी तक्रारदाराकडून 5 हजार रुपये लाच घेताना नगर तालुका पोलिस ठाण्याचा पोलिस लाचलुचपतच्या जाळ्यात सापडला. आज दुपारी ही कारवाई करण्यात आली.

पोलिस नाईक संजय सूर्यभान डाळिंबकर (वय-46) अटक केलेल्या पोलिसाचे नाव आहे. नेहमीच वादग्रस्त असलेले नगर तालुका पोलीस स्टेशन पुन्हा चर्चेत आले आहे. तक्रारदार व त्यांची पत्नी आणि आई वडील यांचे विरुद्ध दाखल गुन्ह्यात तपासात मदत करण्यासाठी व जामीन लवकर होईल, अशी मदत करण्यासाठी पोलिस नाईक डाळींबकर यांनी आज लाच मागणी पडताळणी दरम्यान पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे 8 हजार रुपये लाचेची मागणी केली.

तडजोडीअंती 5 हजार रुपये लाचेची मागणी करून आज नगर तालुका पोलीस स्टेशन आवारात आयोजित लाचेच्या सापळा दरम्यान पंचासमक्ष 5 हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक हरीष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. याप्रकरणी भिंगार कँप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Visit : Policenama.com