नीरेत गांधी जयंती निमित्त महाश्रमदान !

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन (मोहंम्मदगौस आतार) – नीरा येथे म.गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत महाश्रमदान अभियान राबविण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी ( दि.२) रोजी सकाळी महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे सरपंच दिव्या पवार यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात येऊन प्लँस्टिक बंदी बाबत जनजागृती करण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण, गणपत लकडे, हरिभाऊ जेधे, विस्तार अधिकारी सतिश कुंभार, ग्रामसेवक सुभाष लिंबरकर, लेखपाल सचिन ठोंबरे , अंगणवाडी सेविका सुनिता थोरात, त्यांच्या सहकारी सेविका यांच्यासह ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी महाश्रमदान अभियानांतर्गत गावातील शिवाजी चौकातील ग्रामपंचायत कार्यालय परिसर, बसस्थानक, बाजारतळ, पालखी तळ, नीरा-बारामती रोडच्या बाजूचा परीसरातील तसेच नीरा गावातून जाणाऱ्या सातारा- नगर रोडच्या बाजूचा परिसर आदी सार्वजनिक ठिकाणचा प्लँस्टिक कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. या महाश्रमदान अभियानास ग्रामस्थांचाही चागला प्रतिसाद मिळाल्याचे ग्रा.पं. सदस्य अनिल चव्हाण यांनी सांगितले. सुमारे १५० किलो प्लँस्टिक कचरा गोळा करण्यात आला तसेच ओला कचराही स्वच्छ करण्यात आल्याची माहिती ग्रामसेवक सुभाष लिंबरकर यांनी दिली.

Visit : Policenama.com

You might also like