देशात दहशतवादी हल्ला झाला की, आधीचे पंतप्रधान संयुक्त राष्ट्राकडे जाऊन रडायचे : देवेंद्र फडणवीस

श्रीरामपूर : पोलीसनामा ऑनलाइन – आधीच्या सरकारच्या काळात देशात दहशतवादी हल्ला झाला की आधीचे पंतप्रधान संयुक्त राष्ट्राकडे जाऊन रडायचे. मात्र आता ती परिस्थिती राहिली नाही. त्यामुळे आताची निवडणूक देशाच्या संरक्षणाची आणि विकासाची आहे. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे. श्रीरामपूर येथील आयोजित सभेत ते बोलत होते.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रीरामपूर येथे जाहीर सभा झाली. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या कामाचा पाढा वाचून दाखवला. दिवंगत राजीव गांधी ज्यावेळेस पंतप्रधान होते त्यावेळेस ते म्हंटले होते. दिल्लीवरून जर १ रुपया पाठवला तर भ्रष्टाचारामुळे शेवटच्या माणसाच्या हाती १५ पैसे जायचे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ना खाऊंगा ना खाणे दूंगा असे म्हणत जनतेला बँकेत खाते उघडायला लावले. त्यामुळे दिल्लीवरून पाठवलेला १ रुपये शेवटपर्यंत तसाच जातो. भ्रष्टाचार कमी करण्यासाठी मोदींनी ते पाऊल उचलले होते. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, मोदी सरकारने राज्यात ३ लाख शेतकऱ्यांना हक्काचे घर दिले. तसेच मोदी सरकारने शेतकऱ्यांना थेट अनुदान दिले आहे. मोफत औषध उपचार देण्याचे काम सरकारने केले आहे. गॅस सिलेंडर दिले आहे. असेही त्यांनी म्हंटले.

याचबरोबर, २००८ मध्ये मुंबईत दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी विरोधकांनी केवळ निषेध केला. निषेध काय आधीचे पंतप्रधान संयुक्त राष्ट्राकडे जाऊन रडायचे. त्यांना रागवा म्हणून. मात्र आता ती परिस्थती राहिली नाही. ज्यावेळेस उरी हल्ला झाला त्यावेळेस आपल्या जवानांनी त्याचा बदला घेतला, पुलवमा दहशतवादी हल्याचाही आपल्या जवानांनी बदला घेतला. त्यासाठी सक्षम सरकार हवे. असेही त्यांनी म्हंटले. त्यामुळे आताची निवडणूक देशाच्या संरक्षणाची आणि विकासाची आहे. यासाठी भाजप-सेना महायुतीला मतदान करा आणि नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करा असे आवाहनही त्यांनी केले.