पुलवामामध्ये लष्कराकडून 3 दहशतवाद्यांचा ‘खात्मा’, 24 तासातील दूसरी ‘चकमक’

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये लष्काराने 3 दहशतवाद्यांना ठार केले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 24 तासात घडलेले हे दूसरे एन्काऊंटर आहे. लष्करानुसार दक्षिण काश्मीरच्या पुलवामाच्या जदूरा गावात सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांना ठार केले आहे.

यापूर्वी शुक्रवारी सुद्धा काश्मीरमध्ये सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत 4 दहशतवादी मारले गेले होते आणि एका दशहतवाद्याने सरेंडर केले होते. अशाप्रकारे 24 तासात जम्मू-काश्मीरमध्ये 7 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे.