Maharashtra Politics News | ‘शिवसेना आपल्याकडं आहे, त्यांच्याकडं…’, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल (व्हिडिओ)

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | काँग्रेसमधून (Congress) निलंबित केलेले आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी आज भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. पक्षाविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत त्यांना काँग्रेसमधून निष्कासित केले होते. त्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती, (Maharashtra Politics News) अखेर त्यांनी आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.यावेळी बोलताना फडणवीस यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लक्ष्य केलं.

 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्र आले आहेत. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी (NCP) आणि शिल्लक सेना आहे. ती शिल्लक सेनाच आहे. खरी शिवसेना (Shivsena) आपल्याकडं आहे. हे तीनही पक्ष एकत्रित आले, तरीही भाजप-शिवसेना युतीच्या (BJP-Shiv Sena Alliance) पाठिशी जनता उभी राहील. कारण, अडीच वर्षाचा कारभार जनतेने पाहिला आहे, असं फडणवीस म्हणाले. (Maharashtra Politics News)

 

 

 

ठाकरेंना राजकीय समज कमी

अडीच वर्षे मुख्यमंत्री घरातून बाहेरच पडले नाहीत. हे मी म्हणत नाही. शरद पवार यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आत्मचरित्रात लिहिलं आहे. अडीच वर्षाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोनच वेळा मंत्रालयात गेले. त्यामुळे आमचं मोठं नुकसान झालं आहे. उद्धव ठाकरेंना राजकीय समज कमी आहे. असंही शरद पवारांनी पुस्तकात सांगितलं, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

 

वज्रमुठीला तडे गेले

शरद पवार (Sharad Pawar) यांनी ज्यांच्याबद्दल दोन-तीन पाने लिहून ठेवली आहेत. त्यांच्या नेतृत्वात हे वज्रमूठ सभा घेत आहेत.
वज्रमूठ सभेत (MVA Vajramuth Sabha) हे भाषण देत आहेत.
भषण झाल्यावर काँग्रेस, राष्ट्रवादीवाले म्हणतात यांच्याकडं दहा लोकही नाहीत.
आपण लोक आणण्याची आणि हात दाखवत भाषण करायची.
त्यापेक्षा वज्रमूठ बंद करा. म्हणून वज्रमूठ सभा देखील आता बंद झालेल्या आहेत.
वज्रमूठीला इतके तडे गेले आहेत की वज्राचं काम करु शकत नाही, असा टोला फडणवीस यांनी मविआला लगावला.

 

 

Web Title :  Maharashtra Politics News | devendra fadnavis attacks uddhav thackeray over original shivsena

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा