‘मुसळधार’ पावसात शरद पवार उदयनराजेंवर ‘बरसले’ (व्हिडिओ)

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रचारासभांचा झंझावात संपूर्ण महाराष्ट्र पहात आहे. त्यांच्या झंझावती प्रचाराचा आणि पायाला जखमा असतानाही वयाच्या 78 व्या वर्षी शरद पवार पायाला भिंगरी लावल्यासारखे फिरत असल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. आता, साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारसभेत शरद पवारांनी चक्क मुसळधार पावसात सभा घेतली.

मुसळधार पावसात उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधताना त्यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीच्या वेळी आम्ही चूक केली. आम्हाला ती तूक दुरुस्त करायची आहे. साताऱ्यातील चूक दुरुस्त करण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तरुण घराघरातून वाट पहात आहे, असे म्हणत शरद पवारांनी साताऱ्यात उदयनराजेंना लक्ष केले. देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली.

एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री सांगतात, निवडणुकीत विरोधकच नाहीत. आम्हाला दुसऱ्या बाजुला पैलवान दिसतच नाहीत. या तालुक्यात अनेक पैलवान आमच्या नेत्यांनी तयार केले आहेत. भाजपला पैलवान आणि कुस्ती हे शब्द शोभत नाहीत. येत्या 21 तारखेचा निकाल हा सातारा जिल्हा शब्दाचा किती पक्का आहे, हे सांगेल. खऱ्या अर्थाने शिवछत्रपतींचा विचार जतन करणारा हा जिल्हा असल्याचं पवारांनी सांगितलं.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like