Narayan Rane | ‘देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे केंद्रीय मंत्री झालो’ – नारायण राणे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Narayan Rane | माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज पुण्यातील सिंबायोसिस संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकास भेट देत अभिवादन केले. त्यानंतर राणे आणि फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नारायण राणे यांनी आपल्याला मंत्रिपद कसे मिळाले याचा खुलासा केला आहे.

 

त्यावेळी बोलताना नारायण राणे (Narayan Rane) म्हणाले की, ‘देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मला सांगितलं की, तुम्ही दिल्लीत जा आणि सुखी राहा. भाजप पक्षात (BJP) आदेश पाळतात त्याप्रमाणे आम्ही देवेंद्र फडणवीस यांचा आदेश पाळला. दिल्लीला गेलो आणि आता केंद्रीय मंत्री पदावर आहे. त्यानंतर जम्मू-काश्मीर पासून सुरुवात केली. त्यानंतर आसाम आणि अनेक राज्ये फिरलो. माझ्या 8-9 महिन्यांच्या काळात 8 ते 9 राज्य फिरत पुण्याला आलो आहे.’ असं ते म्हणाले.

पुढे नारायण राणे म्हणाले, ‘दर महिन्याला पुण्याला येणारा माणूस आज 4 महिन्यानंतर पुण्याला आला आहे. आणि त्याला कारण व्यासपीठावर बसलेले देवेंद्र फडणवीस हे आहेत. परंतु, आता आनंद आहे, आम्ही आता मित्र आहोत. त्यांनी आम्हाला दिल्लीला पाठवलं त्याचा वेगळा आनंद आहे. महाराष्ट्रात असताना मुख्यमंत्री झालो विरोधी पक्षनेते पद सांभाळलं.’ असं राणे म्हणाले.

 

Web Title :- Narayan Rane | BJP leader devendra fadnavis made me union minister revealed narayan rane in pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Post Office Scheme | विना जोखीम बँकेपेक्षा सुद्धा जास्त मिळवायचा असेल FD वर रिटर्न, तर Post Office मधून मिळवू शकता जास्त नफा! जाणून घ्या कसा?

Omicron Covid Variant | ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढणार पण स्थिती गंभीर नसणार; आयआयटी कानपूरच्या प्राचार्यांचा दावा

SIP Mutual Fund | मुलीचा विवाह करायचा असो किंवा निवृत्तीचा प्लान बनवायचा असो, SIP Formula मध्ये आहेत सर्व उपाय

Shashi Tharoor | शिवसेनेच्या खा. प्रियंका चतुर्वेदींनंतर काँग्रेस खासदार शशी थरुर यांचाही राजीनामा; सोडला TV शो

DGP Sanjay Pandey | पोलीस महासंचालक संजय पांडेंनी आरोप फेटाळले, म्हणाले – ‘परमबीर सिंह यांनी प्रकरण संपवण्यासाठी…’

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांसाठी मोठी खुशखबर ! नववर्षापूर्वी ‘या’ कर्मचार्‍यांच्या पगारात होऊ शकते 95,000 रुपयांपर्यंत वाढ, समजून घ्या ‘कॅलक्युलेशन’