श्रीगोंद्यात ‘नुरा’ कुस्ती ? वडिलांच्या परंपरागत विरोधकांशी हातमिळवणी केल्याने नागवडेंचे राजकारण धोक्यात !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे परंपरागत विरोधक नागवडे घराण्यातील सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समिती सभापती अनुराधा नागवडे व त्यांच्या समर्थकांनी विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार पाचपुते यांचे काम करण्याची जाहीर भूमिका खासदार सुजय विखे यांच्या उपस्थितीत घेतली आहे. परंपरागत विरोधकांशी हातमिळवणी केल्याने नागवडे कूटूंबियांचे राजकारण धोक्यात आले आहे. विधानसभा निवडणूक ‘नुरा कुस्ती’ झाल्यासारखी परिस्थिती ओढवली आहे.

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार राहुल जगताप यांनी दगाफटका होण्याची शक्यता गृहीत धरून निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. नागवडे कुटुंबीयांनी भाजपचे पाचपुते यांचे काम करण्याचा निर्णय घेतल्यामुळे जगताप यांची शक्यता तंतोतंत खरी ठरली आहे. नागवडे यांनी खासदार विखे यांच्या मध्यस्थीने काम करण्याचा निर्णय घेतला. नागवडे यांचे समर्थक त्यांच्यावरच नाराज झाले आहेत. राजकारणात ज्यांना तीव्र विरोध केला, त्यांच्यासोबत हातमिळवणी करणे अनेकांना रुचलेले नाही. त्याचा मोठा फटका नागवडे यांना आगामी राजकारणात बसू शकतो.

वडिलांच्या परंपरागत विरोधकांशी हातमिळवणी
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील निवडणूक पहिल्यांदा लढवताना बबनराव पाचपुते यांनी ज्येष्ठ नेते दिवंगत शिवाजीराव नागवडे यांच्यार जोरदार जहरी टीका करून विजय संपादन केला होता. शिवाजीराव नागवडे यांनी त्यांच्या राजकीय जीवनात बबनराव पाचपुते यांच्याशी कधीही जुळवून घेतले नाही. वडिलांनी संपूर्ण हयातीत ज्यांना विरोध केला, त्या भाजपच्या उमेदवारांच्या प्रचार करण्याचा नागवडे कुटुंबियांचा निर्णय म्हणजे त्यांच्या परंपरागत विरोधकांशी हातमिळवणी करण्यासारखा आहे.

Visit : Policenama.com