Omicron Covid Variant | चिंताजनक राज्यात आज ओमिक्रॉनचे नवे 50 रूग्ण, पुण्यात सर्वाधिक 36

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या (Coronavirus) ओमिक्रॉन व्हेरियंटचे (Omicron Covid Variant) रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड येथे देखील ओमिक्रॉनच व्हेरियंटचा (Omicron Covid Variant) विळखा वाढू लागला आहे. त्यातच रुटीन चेकअप (Routine Checkup) मध्ये ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून येत आहेत. हे रुग्ण परदेशातून आलेल्या ओमिक्रॉन रुग्णांच्या संपर्कात आले नसूनही त्यांना कोरोनाची लागण होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

आज राज्यात 50 नवीन ओमिक्रॉन व्हेरियंटचे (Omicron Covid Variant) रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी पुणे शहरात (PMC) -36, पिंपरी-चिंचवड (PCMC) – 8, पुणे ग्रामीण (Pune Rural) – 2, सांगली (Sangli) -2, ठाणे (Thane), मुंबई (Mumbai) – प्रत्येकी एक रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आजपर्यंत 510 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 193 रुग्ण बरे झाले आहेत.

राज्यात कुठे किती ओमिक्रॉन रुग्ण?

1. मुंबई – 328

2. पुणे महापालिका – 49

3. पिंपरी-चिंचवड – 36

4. पुणे ग्रामीण – 23

5. ठाणे – 13

6. नवी मुंबई, पनवेल – प्रत्येकी 8

7. कल्याण डोंबिवली – 7

8. नागपूर, सातारा – प्रत्येकी 6

9. उस्मानाबाद – 5

10. वसई विरार – 4

11. नांदेड – 3

12. औरंगाबाद, बुलडाणा, भिवंडी, मिरा भाईंदर, सांगली – प्रत्येकी 2

13. लातूर, अहमदनगर, अकोला, कोल्हापूर – प्रत्येकी 1

 

 

Web Title :- Omicron Covid Variant | In a worrying state, 50 new Omicron patients are present, with Pune having the highest number of 36

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या संख्येत वाढ, गेल्या 24 तासात 175 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Coronavirus in Maharashtra | चिंताजनक! राज्यात ‘कोरोना’ रुग्णसंख्येत मोठी वाढ, गेल्या 24 तासात 11,877 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून आईबरोबर शारिरीक संबंध, मुलीशी लग्न लावून देण्यासाठी दिली धमकी

Pune Crime | दुचाकीवरील 2 मुलांना चिरडून पळून गेलेल्या बस चालकाला वाकड पोलिसांकडून अटक

EWS Reservation | EWS आरक्षण उत्पन्नाची मर्यादा 8 लाख रुपये कायम, केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र