Paranjape Builders detained | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून घेतलं ताब्यात

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पुण्यातील आणखी एका नामांकित बिल्डरला (Builder) पोलिसांनी ताब्यात घेतल्याने शहर आणि जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. परांजपे बंधूंना (paranjape builders) पुण्यातून फसवणूक प्रकरणी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फसवणूक प्रकरणी पुणे पोलिसांनी (Pune Police) बिल्डर अमित लुंकडला (Builder Amit Lunkad) दोनच दिवसांपुर्वी अटक केली आहे. बिल्डर अमित लुंकड (Builder Amit Lunkad) सध्या येरवडा जेलमध्ये (Yerwada Jail) आहे. दरम्यान, पुण्यातील प्रसिध्द अशा परांजपे बिल्डर बंधूनां मुंबई पोलिसांनी पुण्यातील राहत्या घरातून ताब्यात घेतल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे. Paranjape Builders detained | Mumbai Police cracks down on famous builder Paranjape brothers; detained from a house in Pune

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

श्रीकांत पुरुषोत्तम परांजपे (वय 63) Srikanth Purushottam Paranjape आणि शशांक पुरुषोत्तम परांजपे (वय 59) Shashank Purushottam Paranjape अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी विलेपार्ले पोलीस ठाण्यात (vile parle police station) दोघांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याबाबत वसुंदरा डोंगरे (Vasundhara Dongre) यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार सीआर नं. 492/2021 कलम 476, 467, 68, 406, 420 व 120 (ब) कलमानव्ये गुन्हा नोंदविलेला आहे.

Builder Amit Lunkad Arrested | बिल्डर अमित लुंकड प्रकरणाचा तपास पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे; फसवणूकीचा आकडा 50 कोटीपर्यंत

सूत्रांच्या माहितीनुसार, फिर्यादी या परांजपे (paranjape builders) कुटुंबाशी संबंधित आहेत. परांजपे यांच्या काही जागा या मुंबईतील विलेपार्ले येथे आहेत. ती जागा विक्री करण्यात आली आहे. फिर्यादी या वारस आहेत. मात्र ही जागा विक्री करत असताना फिर्यादी यांना कळू न देता ही जागा विक्री केली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार दिली होती. याबाबत आज दुपारी विलेपार्ले पोलीस ठाण्यात खोटेदस्त बनवून तसेच विश्वासघात आणि फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल केला. त्यानुसार परांजपे बंधूंना विलेपार्ले पोलिसांच्या पथकाने रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास पुण्यातील राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. त्यांना घेऊन विलेपार्ले पोलीस मुंबईला रवाना झाले आहेत. या घटनेने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

Web Title :- Paranjape Builders detained | Mumbai Police cracks down on famous builder Paranjape brothers; detained from a house in Pune

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

BJP MLA Gopichand Padalkar । गोपीचंद पडळकरांचा घणाघात; म्हणाले – ‘ओबीसी नेत्याचं माकड झालंय’

Career in photography । फोटोग्राफीची आवड आहे? तर मग करिअर? जाणून घ्या सविस्तर

Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार आता भाजपच्या रडारवर? थेट CBI चौकशीचा मांडणार ठराव