Police Inspector Shalini Sharma | अटकेत असलेल्या आरोपीकडे पैशांची मागणी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक महिलेवर खंडणीचा गुन्हा; पोलिस दलात प्रचंड खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Police Inspector Shalini Sharma | महाराष्ट्र पोलीस (Maharashtra Police) दलातील महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी शर्मा (Police Inspector Shalini Sharma) यांच्यावर चेंबूर पोलीस ठाण्यात (Chembur Police Station) खंडणी (Ransom) तसेच धमकी (Threat) देणे या प्रकरणी गुन्हा (FIR) दाखल केला आहे. मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) चेंबूर पोलीस ठाण्यात अटकेत असलेल्या आरोपीकडे खंडणी मागितल्या प्रकरणी शर्मा यांच्यासह एका निलंबित पोलीस अधिकारी (Suspended Police Officer) आणि इतर एकावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

चेंबूर पोलीस ठाण्यात एक वर्षापूर्वी शालिनी शर्मा या कार्यरत होत्या. निलंबित पोलीस अधिकारी अनिल उर्फ भानुदास जाधव (Anil alias Bhanudas Jadhav) आणि त्याचा हस्तक राजू सोनटक्के (Raju Sontakke) अशी इतर आरोपींची नावे आहेत. अनिल जाधव याने अटकेत असलेल्या आरोपीला जामीन (Bail) मिळवून देण्यासाठी 50 लाखाची खंडणी मागितली होती. तसेच पैसे दिले नाहीतर इतर गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याची तक्रार आरोपीची बहिण शहिदा कुरेशी (Shahida Qureshi) यांनी पोलीस ठाण्यात केली आहे. अशीच तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देखील करण्यात आली होती. (Police Inspector Shalini Sharma)

पोलिसांचा हस्तक राजू सोनटक्के याने आरोपीकडे व्हॉट्सॲप कॉल करुन दोन लाख रुपये मागितल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता.
यावर गुन्हे शाखेच्या (Crime Branch) वतीने तक्रारीची शहानिशा करुन या प्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडून केला जात आहे.

 

विशेष म्हणजे शालिनी शर्मा यांनी पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी (Remarkable Performance) केल्याबद्दल राष्ट्रपती पुरस्काराने (Presidential Award) सन्मानित करण्यात आले होते.
तर नागपाडा पोलीस ठाण्यात (Nagpada Police Station) नेमणुकीस असताना शाहीन बाग आंदोलन (Shaheen Bagh Agitation) प्रकरणात समाजवादी पार्टीचे (Samajwadi Party MLA) आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांच्यासोबत खटका उडाला होता.
त्यानंतर त्यांची चेंबूर पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली.
आता त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Web Title :- Police Inspector Shalini Sharma | mumbai police case of extortion has been registered against senior police inspector shalini sharma

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा