T – 20, वन-डे आणि आता कोसोटीचा ‘हिटमॅन’ ! रोहित बनला ‘सिक्सर’किंग

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियाच्या हिटमॅनने विशाखापट्टणम येथे दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी एक नवीन रेकॉर्ड बनवले आहे. हिट शर्मा आता कसोटी, वनडे आणि टी-20 या तीनही फॉरमॅटमध्ये एकाच सामन्यात सगळ्यात जास्त षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे.

रोहित शर्माने 2013 मध्ये खेळलेल्या एका वनडे सामन्यात 16 षटकार मारले होते. त्यानंतर त्याने 2017 मध्ये श्रीलंकेच्या विरोधात खेळल्या गेलेल्या टी-20 सामन्यात 10 षटकार मारले होते.

नुकत्याच सुरु असलेल्या कसोटी सामन्यात रोहित शर्माने 13 षटकार मारले आहेत. त्यामुळे आता क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे रोहित शर्मा हा एकमेव फलंदाज आहे.

रोहित शर्माच्या विक्रमावर एक नजर
टेस्ट: 13 षटकार – विरुद्ध साउथ अफ्रीका – विशाखापट्टणम 2019
वनडे: 16 षटकार – विरुद्ध ऑस्ट्रेलिया – बँगलोर 2013
टी-20: 10 षटकार – विरुद्ध श्रीलंका – इंदौर 2017

नुकत्याच सुरु असलेल्या कसोटी सामन्यांमध्ये रोहित शर्माने दुसऱ्या डावात सात तर पहिल्या डावात सहा षटकार लगावले होते आणि सर्वाधिक तेरा षटकार मारणारा तो एकमेव कसोटी फलंदाज ठरला आहे.
या आधी हा विक्रम पाकिस्तानच्या वासिम आक्रमच्या नावे होता त्यांनी 1996 मध्ये जिम्बाब्वेच्या विरोधात 12 षटकार मारले होते.

भारतीय फलंदाजांपैकी हा विक्रम नवजोत सिंह सिद्धूच्या नावे होता. त्यांनी 1994 मध्ये श्रीलंकेच्या विरोधात आठ षटकार मारले होते

Visit : Policenama.com