#FactCheck : विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा खरंच प्रेग्नंट आहे का ? जाणून घ्या सत्य

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि त्याची पत्नी बॉलिवूड स्टार आणि एक प्रोड्युसर अनुष्का शर्मा सध्या जोरदार चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे त्यांच्या घरी पाळणा हलणार असल्याचं बोललं जात आहे. विराट आणि अनुष्काचा एक फोटो खूप व्हायरल होत आहे. जाणून घेऊयात या फोटोमागील सत्य.

सध्या एक फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल होत आहे. यात दिसत आहे की, अनुष्का प्रेग्नंट असून ती तिचं बेबी बंप दाखवत आहे. याशिवाय विराटदेखली तिला मागील बाजूनं बिलगला आहे. दोघेही खूप खुश आहेत. हा एक मोनोक्रोम फोटो आहे. सध्या हा फोटो व्हायरल होत असून असं सांगितलं जात आहे अनुष्का प्रेग्नंट आहे आणि लवकरच त्यांच्या घरी पाळणा हलणार आहे.

विराट आणि अनुष्काच्या या व्हायरल फोटोचं फॅक्ट चेक केल्यानंतर असं समजलं आहे की हा फोटो खरा नसून मॉर्फ केलेला आहे. असाच सेम फोटो बॉलिवूड स्टार रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांचा आहे. हे दोन्हीही फोटो हुबेहूब वाटत आहे. त्यामुळं फॅक्ट चेकमध्ये हा फोटो खोटा असल्याचं समजत आहे. सदर फोटो रितेश आणि जेनेलियाचाच आहे असा दावा आम्ही करत नाही. परंतु अनुष्का आणि विराट तो फोटो मॉर्फ केलेल आहे हे मात्र नक्की आहे.