Maharashtra Politics News | ‘रात गई, बात गई’ असं उद्धव ठाकरे म्हणाले तर…, भाजप नेत्याचं सूचक वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) ‘रात गई, बात गई’ असं म्हणाले, तर एकत्र येता येईल, असं सूचक विधान मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं आहे. ते शुक्रवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते. यावेळी त्यांना (Maharashtra Politics News) उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत (BJP) येण्याबाबत काही संकेत दिले आहेत का, असे विचारले असता चंद्रकांत पाटील यांनी नाही असे उत्तर दिले.

 

चंद्रकांत पाटील म्हणाले, मी जसा भाजपचा नेता आहे, तसाच एक माणूस आहे. महाराष्ट्राचा नागरिक आहे. घडणाऱ्या घटनांमुळे (Maharashtra Politics News) मी व्यथित होतो, त्यामुळे मी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वासाठी (Hindutva) भाजपसोबत यावे असे म्हटलं. माझ्या पक्षात एवढं स्वातंत्र्य आहे. शरद पवारांच्या (Sharad Pawar) मागे गेल्याने अनेक नेत्यांची माती पवारांनी केली. तसेच ते पक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांची माती करतील.

 

‘रात गई, बात गई’ असं म्हणाले तर…

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं मन किती मोठं आहे हे मला माहिती आहे. परंतु काहीही बोलाल तर ते सहन करणार नाही. हम किसी को टोकेंगे नाही, किसीने टोका तो छोडेंगे भी नही. आम्ही कुणालाही त्रास द्यायला जात नाही. उद्धव ठाकरे ‘रात गई, बात गई’ असं म्हणाले तर एकत्र येता येईल. परंतु, नही मेरा दरवाजा बंद है, असं उद्धव ठाकरेंनी 33 महिने केलं. त्यांनी एकदाही असं म्हटलं नाही की, तू घरी ये, आपण एकत्र बसू. देवेंद्र फडणवीस असे दरवाजे बंद करणारे नाहीत, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

 

तर सहन करणार नाही

 

राजकारणामध्ये (Maharashtra Politics News) लवचिकता असणे फार महत्त्वाचे आहे. ताठरपणाने स्वत:चाही फायद होत नाही आणि पक्षाचाही तसेच समजाचा देखील फायदा होत नाही. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं पाहिजे की, त्या-त्या वेळी बोललो, त्यात मनापासून काही नाही. परंतु, ते काहीही बोलले तर ते आम्ही अजिबाद सहन करणार नाही, असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला.

 

Web Title :- Maharashtra Politics News | chandrakant patil comment on uddhav thackeray bjp future alliance


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update


हे देखील वाचा

 

Ajit Pawar | ‘नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्ये करु नयेत, त्याची सुरुवात चंद्रकांत पाटलांनी स्वत: पासून करावी’,
अजित पवारांचा टोला (व्हिडिओ)

CM Eknath Shinde | ‘मी सर्वांना कामाला लावलंय, घरात बसणारे रस्त्यावर येऊ लागले’,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला (व्हिडिओ)

Pune Crime News | आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या बुकीला गुन्हे शाखेकडून अटक; पुण्यातील इतर बुकी पोलिसांच्या ‘रडार’वर

Department of Registration and Stamps Pune | मुद्रांक खरेदीसाठी प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज नाही,
विरोधानंतर नोंदणी महानिरीक्षकांचे आदेश