Maharashtra Politics News | शरद पवारांच्या गुगलीमुळेच उद्धव ठाकरे कायमचे घरी बसले, भाजप आमदराचा टोला (व्हिडिओ)

कणकवली : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | शरद पवारांचे (NCP Chief Sharad Pawar) एकाच वेळेला गुगली आणि सिक्सर दोन्ही होते. शरद पवारांना समजून घेण्यासाठी भाजपला शंभर जन्म घ्यावे लागतील, अशी टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली होती. या टिकेला प्रत्युत्तर देताना भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी टोला लगावला आहे. (Maharashtra Politics News) शरद पवार समजायला आम्हाला जर शंभर जन्म घ्यावे लागणार असतील तर उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) दोनशे जन्म घ्यावे लागतील. पवार यांच्या गुगलीमुळे पहाटेच्या शपथविधीत जशी अजित दादांची (Ajit Pawar) विकेट पाडली, तशी ठाकरेंना कायमचे घरी बसवून त्यांचीही विकेट पाडली, असा टोला राणे यांनी लगावला.

नितेश राणे कणकवली येथील त्यांच्या निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते. नितेश राणे म्हणाले, बाळासाहेबांची (Balasaheb Thackeray) हिंदुत्वावादी विचारसरणी उद्धव ठाकरे यांनी सोडली. त्यामुळे त्यांना बाजूला करुन 50 योद्धे सोबत घेऊन शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis Government) यांनी राज्यात सत्ता आणली. हिंदुत्ववादी सरकार आणले (Maharashtra Politics News) आणि ठाकरे यांना कायम स्वरुपी घरी बसवले. आज त्या स्वाभिमानाची वर्षपूर्ती आहे. बाळासाहेबांच्या विचारांचे हिंदुत्व आणि सरकारची वर्षपूर्ती असल्याचे नितेश राणे म्हणाले.

वरुण सरदेसाई शकुनी मामा

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे जवळचे आणि कट्टर असलेले राहुल कनाल (Rahul Kanal) हे शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करणार आहेत. हा आदित्य ठाकरे यांना खूप मोठा राजकीय धक्का आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे संजय राऊत हे शकुनी मामा आहेत. तसा वरुण सरदेसाई (Varun Sardesai) हा आदित्य ठाकरेंकडे शकुनी मामा आहे. त्यांच्यामुळे आदित्य ठाकरेंच्या आजू बाजूला फक्त नातेवाईक शिल्लक राहिले आहेत. त्यांना पदाधिकारी, कार्यकर्ते सोडून चालले आहेत, असेही नितेश राणे म्हणाले.

ठाकरेंना निवृत्त करण्याचे काम…

संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना नितेश राणे म्हणाले, शरद पवारांच्या भाषेत सांगायचे झाले तर ठाकरेंना कायमचे निवृत्त करण्याचे काम संजय राऊत, सरदेसाई करत आहेत. खासदार संजय राऊत हे दिल्लीत हाऊस किपिंगचे काम करत आहेत का? त्यांना मंत्रिमंडळ विस्ताराबाद्दल काय माहीत आहे. त्यांनी फक्त पत्रकारिता करावी. असंही राणे यांनी म्हटले.

Web Title : Maharashtra Politics News | NCP chief sharad pawar made uddhav thackeray sit at home forever says mla nitesh rane

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा