नवी दिल्ली : Pranayam | धावपळीच्या या युगात अनेकांकडे जीमला जाण्यासाठी वेळ नसतो. परंतु, घरातच काही व्यायामाचे प्रकार करून तुम्ही स्वताला निरोगी ठेवू शकता. तसेच दिवसभर काम करण्यासाठी आणि उत्साही राहण्यासाठी तुम्ही प्रणायाम (Pranayam) देखील करू शकता. सकाळी-सकाळी प्राणायाम करून स्वतःला दिवसभर एनर्जेटिक ठेवू शकता.
कपालभाती
या प्राणायाममुळे शारीरिक थकवा आणि अशक्तपणा दूर होतो. ऊर्जा जास्त काळ टिकते. शरीरात रक्ताभिसरण वाढल्याने ऊर्जा वाढते.
अनुलोम-विलोम
अनुलोम-विलोम शरीरात चैतन्य आणण्यासाठी खूप उपयुक्त आहे. हे आसन श्वासोच्छवासाची प्रक्रिया सुधारते. रक्ताभिसरण देखील गतिमान करते. ज्यामुळे शरीरात थकवा आणि अशक्तपणा जाणवत नाही.
भस्त्रिका
भस्त्रिका प्रणायाम (Pranayam) केल्याने शरीरात एनर्जी लेव्हल वाढते. शरीरात चपळता येते.
याशिवाय अशक्तपणा आणि थकवाही दूर होतो. हे प्राणायाम नियमितपणे केल्याने आरोग्याशी संबंधित अनेक
समस्यांवर फायदेशीर ठरू शकते. यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळेल आणि बरे वाटेल.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा