Pune Crime | मद्यप्राशन करुन भरधाव बुलेट चालवणे बेतलं जीवावर, एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मद्यप्राशन (Alcohol) करुन भरधाव वेगात विरुद्ध बाजूने बुलेट चालवणे पुण्यातील (Pune Crime) एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. बुलेटची धडक समोरून येणाऱ्या कारला (Bullet hit Car) बसून झालेल्या भीषण अपघातात (accident) एका तरुणाचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला आहे. हा अपघात पुण्यातील (Pune Crime ) कोथरुड येथील पौड रोडवर (Paud Road, Kothrud) 29 नोव्हेंबर रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास झाला.

 

शिवम राजेंद्र पवार Shivam Rajendra Pawar (वय-21 रा. पूर्वा अपार्टमेंट, कोथरुड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर शैलेश घाग (Shailesh Ghag) हा गंभीर जखमी झाला आहे. कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud police station) याप्रकरणी गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसास, मयत शिवम आणि जखमी शैलेश हे दोघे 29 नोव्हेंबर रोजी रात्री जेवण करण्यासाठी रॉयल इन्फिल्ड (Royal Enfield) दुचाकीवरून जात होते. दुचाकी चुकीच्या दिशेने आणि भरधाव वेगात जात असताना समोर येणाऱ्या चार चाकीवर जाऊन धडकली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, शिवम याचा मृत्यू झाला.

कोथरुड पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.
मात्र पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान रुग्णालयातील कागदपत्रे तपासली.
त्यावळी शिवम पवार याने मद्यपान करुन गाडी चालवल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार पोलिसांनी मयत शिवम पवार याच्यावर गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.
पुढील तपास कोथरुड पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | one died in accident in kothrud area another one injurder

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

PM Kisan | तुमच्या स्टेटसमध्ये सुद्धा लिहीलाय का ‘हा’ शब्द, जाणून घ्या काय आहे अर्थ आणि केव्हापर्यंत येईल रक्कम?

Pune Crime | एक्सर्बिया डेव्हलपर्सकडून 45 लाखांची फसवणूक ! कंपनीचे संचालक विशाल नहार, राहूल नहार, सचिन पाटील, नितीन सैद यांच्यावर FIR

Priyanka Chaturvedi | शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींचा राजीनामा ! उपराष्ट्रपतींना पत्र लिहून व्यक्त केली खंत; सांसद टीव्हीचे अँकरपद सोडले

Pune Crime | पोलीस चौकीतील खुर्च्या फेकून देत पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण, पुण्यातील खळबळजनक घटना

Pune Blind Men’s Association | ‘पुणे अंध जन मंडला’चा ‘पुणे प्रार्थना समाज – डेव्हिड रॉबर्ट्स पुरस्कार 2021’ने गौरव