Vinayak Raut | ‘जनाब’ विधानावरून विनायक राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले – ‘फडणवीस तर दोन वर्षांपूर्वीच ‘मियाँ देवेंद्र’ झालेत’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Vinayak Raut | माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काही दिवसांपुर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जनाब असं संबोधलं होतं. यावरुन आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ”देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जनाब ही उपाधी देऊन त्यांचा अवमान केला आहे. त्यांचे हे वक्तव्य अक्षम्य असून फडणवीस हे मियाँ देवेंद्र असल्याची टीका राऊत यांनी केली आहे. त्यावेळी विनायक राऊत यांनी मंगळवारी माध्यमांशी संवाद साधला.

 

विनायक राऊत (Vinayak Raut) हे शिवसंपर्क अभियानासाठी मंगळवारी औरंगाबादमध्ये (Aurangabad News) आले असताना त्यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेनंतर विनायक राऊत म्हणाले की, ”त्यांचे इफ्तार पार्टीमधील फोटो दाखवित फडणवीस हे 2 वर्षांपूर्वीच मियाँ झाले आहेत,” असा टोला लगावत एमआयएम आणि महाविकास आघाडी एकत्रित येण्याचे ‘पिल्लू’ भाजपनेच सोडल्याचा आरोप देखील राऊत यांनी केला आहे.

 

पुढे बोलताना राऊत म्हणाले, ”जनतेने शिवसेनाप्रमुख ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट ही उपाधी दिली आहे.
दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी देखील त्यांच्या हिंदुत्व विचारांचे अनुकरण केले.
मात्र फडणवीसांनी त्यांना जनाब असा उल्लेख करून अक्षम्य पाप केले आहे.
शिवसेनेने हिंदुत्व सोडले नाही, मात्र फडणवीसांसह भाजपाने मुस्लिमांच्या मतांसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवले आहे.” असा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, ”महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षात चलबिचल वाढवण्यासाठी एमआयएमसोबत आघाडी होईल, असे ‘पिल्लू’ भाजपने सोडण्याचे षडयंत्र रचले.
पण, शिवसेना हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही. एमआयएमला शिवसेना कधीही जवळ करणार नाही, त्या पक्षाने भाजपचे बटीक रहावे.”
‘खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) नाटक करीत असल्याचा टोला देखील राऊत यांनी लगावला आहे.

 

Web Title :- Vinayak Raut | devendra fadnavis now called as miya devendra shiv senas counter attack on janab statement

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Savitribai Phule Pune University (SPPU) | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देणार मराठी संवर्धनाला चालना, युवासेनेकडून कुलगुरुंना निवेदन

 

Tara Sutaria Spotted | एवढे छोटे कपडे घालून खरेदीला निघाली तारा सुतारिया, कपडे पाहून रस्तावरील लोक तिला बघतच बसले..

 

Supriya Sule | सुप्रिया सुळेंची मोदी सरकारवर टीकास्त्र; म्हणाल्या – ‘दर महिन्याला निवडणूक लावा म्हणजे…’