‘भाईजान’ सलमानचा ‘बॉडीगार्ड’ शेरा सर्वात प्रथम ‘इथं’ नोकरी करायचा, आता मिळतो ‘एवढा’ पगार, जाणून घ्या सर्व काही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार सलमान खानचा बॉडीगार्ड शेराने शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते. गुरमीत सिंह जॉली उर्फ शेरा बॉलिवूड स्टार सलमान खानचं संरक्षण करतो. आज आपण त्याची पहिली नोकरी कोणती आहे आणि तो सलमान खानचा विश्वासू बॉडीगार्ड कसा बनला. हे आपण जाणून घेणार आहोत.

शेराचा जन्म अंधेरी, मु्बईत शीख परिवारात झाला होता. शेरा मोठा होत असतानाच त्याचा कल बॉडी बनवण्याकडे होता. लहानपणी शेराचं नाव शेर सिंह होतं. यानंतर त्याचं नाव गुरमीत सिंह जॉली बदलून शेरा पडलं.

एका रिपोर्टनुसार, शीख असूनही शेराने नोकरीसाठी आपल्या पगडीचा त्याग केला. त्याने एका मुलखतीत म्हटलं, “जेव्हा तु्म्ही सेक्युरिटीचं काम करता तेव्हा गर्दीत पगडी सांभाळणं अवघड होतं. त्यामुळे त्याने केस कापण्याचा निर्णय घेतला. जेव्हा सलमान शेराला भेटला तेव्हा तो पगडीमध्ये होता.

सलमान खानचा बॉडीगार्ड होण्याआधी शेरा त्याच्या वडिलांच्या वर्कशॉपवर वेळ घालवत होता. शेरा आयरन पंपिंगचं काम करत होता. यानंतर शेरा बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये भाग घेऊ लागला. अनेक स्पर्धा जिंकण्यात तो यशस्वी झाला. यानंतर शेराने ज्युनियर मि. मुंबई आणि ज्युनियर मि. महाराष्ट्र किताब जिंकले.

शेराच्या प्रभावी बॉडीमुळे त्याला 90 च्या दशकात, बॉलिवूडच्या मोठ्या लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळण्याची संधी मिळाली. Wizcraft या कंपनीत काम करण्याची त्याला संधी मिळाली.

असा झाला सलमानचा बॉडीगार्ड
1997 साली सलमान खानने चंदीगढला एक शो केला होता. सिक्युरिटी अरेंजमेंट व्यवस्थित नसल्याने लोकांची गर्दी स्टेजवर जमा झाली. यामुळे पूर्ण शो खराब झाला. यानंतर सलमान खानचा भाऊ सोहेल खानने शेराला ऑफिसमध्ये बोलावलं. त्यावेळी शेरा बाहेरून आलेल्या हॉलिवूड स्टार्सना सेक्युरिटी देत होता. याबाबत शेराने सांगितले मी बॉलिवूडमध्ये नव्हतो.

यानंतर सोहेलने शेराला बोलावलं. तो सेक्युरिटी साठी एका मजबूत व्यक्तीच्या शोधात होता. जो सर्व जबाबदारी सांभाळू शकेल. यानंतर शेरा 1997 साली सलमान खानचा बॉडीगार्ड बनला. शेरा सलमान खानला मालिक म्हणून हाक मारतो.

शेराची एक सेक्युरिटी कंपनीही आहे. जिचं नाव त्याचा मुलगा टायगरच्या नावाने ठेवण्यात आलं आहे. ही कंपनी बॉलिवूड स्टार्सना सुरक्ष प्रदान करते. मीडिया रिपोर्टनुसार, शेराच्या इन्कम बद्दल बोलायचे झाले तर तो प्रत्येक महिन्याला 15 लाख रुपये कमावतो. सलमान खानच्या टीमकडून मात्र शेराच्या सॅलरीबद्दल अधिकृत माहिती मिळालेली नाही.

Visit : policenama.com

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like