Pune Pimpri Chinchwad Crime News | उपचारासाठी आलेल्या तरुणीशी डॉक्टरचे गैरवर्तन, पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | उपचारांच्या नावाखाली एका तरुणीचा विनयभंग (Molestation) केल्याची घटना शुक्रवारी (दि.22) पुण्यातील पद्मावतीनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी डॉक्टरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शुक्रवारी पद्मावती येथील डॉ. पिंगळे क्लिनीक येथे रात्री पावणे अकराच्या सुमारास घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत सहकारनगर येथे राहणाऱ्या एका तरुणीने सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakarnagar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन डॉ. हनुमंत पिंगळे Dr. Hanumant Pingle (रा. निर्मल पार्क सोसायटी, पद्मावतीनगर) याच्यावर आयपीसी 354, 354ड नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहकारनगर परिसरात राहणाऱ्या तरुणीला ताप आल्याने तसेच बरे वाटत नसल्याने ती आरोपीच्या डॉ. पिंगळे क्लिनिकमध्ये उपचारासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी हनुमंत पिंगळे याने तरुणीला तपासण्याच्या बहाण्याने अश्लील चाळे केले. तसेच तिच्या शरीराला स्पर्श करुन तरुणीच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस.एन. खेतमाळस (PSI S.N. Khetmalas) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

चांगल्या परताव्याच्या आमिषाने साडे 6 कोटींची फसवणूक, ट्रेड वर्ल्ड मार्केट सोल्यूशन्स कंपनीच्या मालक व एजंटवर MPID

‘पोलिसात तक्रार केली तर सुटल्यावर मर्डर करीन’, दारुसाठी पैसे न दिल्याने तरुणावर कोयत्याने वार; चिंचवडमधील घटना

तक्रार दिल्याच्या कारणावरुन बांधकाम व्यावसायिकाचे घर पेटवले, तळेगाव दाभाडे येथील घटना

हळदीच्या कार्यक्रमात राडा, नवरदेवावर कोयत्याने वार; तीन जणांना अटक, वाकड परिसरातील घटना

10 हजाराची लाच घेताना पोलीस निरीक्षकासह, शिपाई अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार, चार जणांना अटक; कर्वेनगर मधील घटना

पीएमपीएमएल बस कर्मचाऱ्याला मारहाण करुन रोकड पळवली, दोघांना अटक; बिबवेवाडी परिसरातील घटना

‘आम्ही इकडचे भाई आहोत’ हवेत कोयते फिरवून एकावर वार, येरवडा परिसरातील प्रकार

जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी उकळली, एकाला अटक; कर्वेनगर परिसरातील घटना

हडपसर परिसरात दहशत माजवणाऱ्या तिरुपती उर्फ टक्या लष्कर टोळीवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 105 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA